ORS म्हणजे काय: कसे वापरायचे, फायदे आणि योग्य प्रमाणात कसे द्यायचे. (What is ORS:how to made ,benifits, how to give.)
ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हा डिहायड्रेशन वर एक प्रभावी उपचार आहे. यात साखर ,पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स मुख्यतः सोडियम पोटॅशियम याचे मिश्रण म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन.Oral rehyderation solution (ORS).
ORS चे घटक खालील प्रमाणे दिलेले आहे.(Contents of ORS):-
- Sodium. 75
- Potassium. 20
- Glucose. 75
- Citrate. 10
- Total. 245
ORS शरीरातील पाण्याची पातळी समतोल करण्यास कसे मदत करते ते जाणून घेऊया(How ORS help to rehydrate the body):-
ORS मधील ग्लुकोज शरीरात सोडियम आणि पाणी शोषून घेण्यास मदत करते व शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखून ठेवते.
1975 पासून, जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) आणि युनिसेफ (UNICEF) अतिसारामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनवर उपचार करण्यासाठी ORS चा वापर करत आहेत. 1980 पासून, ORS च्या वापरामुळे अतिसाराशी संबंधित मृत्यू दर दोन-तृतीयांशने कमी झाले आहेत.
मुलांसाठी ओरल रिहायड्रेशन थेरपी सुरक्षित आहे का?(Is ORS safe in children?):-
ओरल रिहायड्रेशन थेरपी मुलांसाठी अतिशय सुरक्षित आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत मुलांना अतिसारामुळे(हगवण) डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. मुलांचा मेटाबोलिक रेट (Metabolic Rate) जास्त असतो, त्यामुळे त्यांचे शरीर पाणी लवकर वापरते.
डीहायड्रेशनची अन्य कारणे(other causes of dehydration):-
- जखमा
- जास्त घाम येणे
- कमी पाणी पिणे
- उलटी
- जळीत रुग्ण
ORS हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) चे प्रमाण सामान्य करण्यासाठी वापरले जाते. परंतु जर ORS सोल्युशन योग्यरित्या तयार न केल्यास ते सोलुशन हानिकारक ठरू शकते.
ORS तयार करण्याची प्रक्रिया (How to prepare ORS):-
लागणारे साहित्य (Material Required):-
- WHO प्रमाणित ORS चे पॉकेट
- स्वच्छ उकळून (10---15 मिनिट) थंड केलेले पाणी
- पाणी मोजण्यासाठी मापाचा ग्लास
- स्वच्छ कंटेनर
प्रक्रिया (Procedure to make ORS)
- ORS तयार करण्यापूर्वी हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे
- 1 लिटर(1000 मिली) स्वच्छ उकडून थंड केलेले पाणी घ्या
- ORS चे पाउच उघडा आणि त्यातील पूर्ण पावडर पाण्यात टाका
- पाण्यात टाकलेले ORS पूर्णपणे विरघळे पर्यंत चमच्याने ढवळा
- तयार केलेले ORS 24 तासापर्यंत वापरता येते
- तयार केलेल्या ORS थंड व स्वच्छ ठिकाणी झाकून ठेवावे
चव कशी असावी(how should it test):-
- तयार केलेल्या सोल्युशनची चव खारट गोडसर असते
- तयार केलेले ORS सोल्युशन फारच गोड , फारच खारट किंवा विचित्र चव असल्यास ते सोल्युशन फेकून द्यावे आणि दुसरे बनवावे.
ORS चा डोस (Dose of ORS):-
वय गट. |
|
---|---|
2 वर्ष च्या खाली | 50–100 मिली |
2–10 वर्ष दरम्यान | 100–200 मिली |
10 वर्षे च्या वर असल्यास |
200–400मिली |
ORS सोलुशन कधी फेकून द्यावे (When to throw away ORS solution):-
- 24 तासानंतर उरलेले ORS सोल्युशन फेकून द्यावे कारण त्यात जंतू संसर्ग वाढू शकतो
- कंटेनर झाकलेले नसल्यास
- ORS मध्ये माती ,धूळ गेलेली असल्यास
- ORS चा वास अथवा चव बदललेली असल्यास
घरगुती ORS बनवण्याची पद्धत(How to make homemade ORS):-
- पाणी 1 लिटर
- साखर सहा चमचे
- मीठ अर्धा चमचा
- चव गोडसर-खारट असावी. अधिक खारट/गोड असल्यास अधिक पाणी टाकावे. हे पाणी ORS सारखे नसले तरी सौम्य प्रमाणात पाण्याची कमतरता भरून काढू शकते. घरी बनवलेल्या ORS ने डीहायड्रेशन वर उपचार करता येत नाही. डीहायड्रेशन नसेल तर ORS ची गरज नसते.ORS डॉक्टरांनी लिहून दिलेले अथवा ओव्हर द काउंटर ORS वापरावे
डीहायड्रेशन नसेल तर ORS व्यतिरिक्त खालील पर्याय वापरता येतात(If no dehydration, the following options can be used alternative to ORS):-
- बाळ आईच्या दुधावर असल्यास स्तनपान सुरू ठेवावे
- डाळीचे /वरनाच पाणी
- ताक/लस्सी
- नारळपाणी
- फळांचा रस
- ORS ची योग्य मात्रा तुमच्या वयावर अवलंबून असते.
ORS सोल्युशन ची गरज कधी असते?(When is ORS solution needed?)
ORS सोल्युशन डॉक्टर ने सांगितल्या नंतरच वापरावीत.
ORS सोलुशन गरज नसताना पिल्यास हायपरनाट्रेमिया (hypernatremia) मिठाची विषबाधा होऊ शकते.
उलट्या किंवा अतिसार असल्यास प्रथम डॉक्टर ला भेटावे आणि नंतर मग डॉक्टर ठरवतील की तुम्हाला फक्त पाणी पुरेसे आहे की ORS ची गरज आहे. तुमचे वय,आरोग्य स्थिती आणि अन्य गोष्टी तपासून डॉक्टर ठरवतील की तुम्हाला ORS ची गरज आहे अथवा नाही.तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, फ्रूटस ज्यूस पातळ केलेला,ताक हे लिक्विड पिऊनही तुम्हाला डीहायड्रेशन ची लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
ORS चे संभाव्य दुष्परिणाम (Possible side effects of ORS):-
- उलट्या
- मळमळ
- भूक न लागणे
- अशक्तपणा
- जास्त तहान लागणे
- कन्फुजन
खालील परिस्थितीत ORS चा उपयोग डॉक्टर च्या सल्ल्यानेच करावा:(ORS should be used only under the advice of a doctor in the following situations):-
- किडनी चे आजार असल्यास
- मधुमेह असल्यास
- हृदय चे आजार असल्यास
- ब्लड प्रेशर ची औषधी घेत असल्यास
जर तुम्हाला खूप अतिसार(हगवण) /उलट्या होत असतील , तर डॉक्टरांना भेटा. डॉक्टर ठरवतील की तुम्हाला भरती करून iv फ्लूइड ची गरज आहे अथवा,ORS ची गरज आहे की तुम्ही साधे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट करू शकता.