प्रेग्नन्सी चेक किट/Pregnancy Test Kit
असुरक्षित संभोग केला असल्यास, कुठले ही गर्भ निरोधक साधनाचा उपयोग न केल्यास आणि त्या दरम्यान पाळी चुकल्यास आपण गर्भवती तर नाही ना ह्याचे उत्तर म्हणजे घरगुती प्रेग्नन्सी टेस्ट किट.गर्भधारणा झाल्यास शरीरात hCG हे हार्मोन तयार होते आणि हे हार्मोन शोधायचे काम प्रेग्नन्सी टेस्ट किट करते.
गर्भधारणा ओळखण्यासाठी युरीन प्रेग्नन्सी टेस्ट (UPT) कशी केल्या जाते, तिचे तत्त्व, प्रक्रिया व मर्यादा ह्या बद्दल सविस्तर माहिती घेऊया.
सारनी/Content
- गर्भ धारणा तपासणीचे प्रकार/types of pregnancy test
- hCG हार्मोन काय असते/what is hCG harmone
- गर्भधारणा तपासणी कधी करावी/when to do pregnancy test
- युरिन pregnancy चे तत्व/principle of UPT युरिन चा नमुना कसा गोळा करायचा/how to collect urine sample
- मूत्र गर्भ धारणा चाचणी कशी करायची /how to check Pregnancy
- गर्भधारणा तपासणीची मर्यादा/limitations of UPT
- निष्कर्ष/conclusions
गर्भधारणा तपासणीचे प्रकार/Types of Pregnancy tests
गर्भधारणा तपासणी करीता दोन प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात:
- रक्त चाचणी /Blood Test
ही तपासणी डॉक्टर च्या सल्ल्याने केली जाते.ही तपासणी युरिन टेस्ट पेक्षा अधिक संवेदनशील असते
- . युरिन चाचणी/Urine test
दोन्ही चाचण्या human chorionic gonadotropin (hCG) हे हार्मोन तपासले जाते.
hCG हार्मोन बद्दल माहिती/Know about hCG
- हे हार्मोन गर्भधारणे दरम्यान प्लासेंटा/Placenta द्वारे तयार केल्या जाते.
- गर्भधारानेच्या 7--10 दिवसानंतर हे हार्मोन लघवी मधे आढळून येते.
- पहिली मासिक पाळी चुकल्यास hCG हार्मोन ची लेवल 100 mIU/ml पेक्षा जास्त होते.
- hCG हार्मोन ची लेवल 10--12 आठवड्यामध्ये 100000--200000mIU/ml इतकी वाढते.
- गर्भधारणे नंतर hCG हार्मोन ची पातळी सतत वाढत जाते म्हणून युरीन प्रेग्नन्सी टेस्ट/UPT ही सोपी आणि लवकर होणारी तपासणी आहे.
प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी/When to do a pregnancy test
अधिक अचूकतेसाठी, पाळीच्या ठरलेल्या तारखेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी टेस्ट करणे अधिक उपयुक्त ठरेल.
जर टेस्ट निगेटिव्ह आली आणि तरीही पाळी नाही आली, तर ३-५ दिवसांनी टेस्ट परत करा.
युरीन प्रेग्नन्सी टेस्टचे (UPT) तत्त्व /Principle of UPT test
UPT ही एक lateral-flow immunoassayची तपासणी आहे.ही तपासणी मध्ये युरीनमधील hCG चे परीक्षण करते.
- ह्या तपासणी मध्ये दोन रेषा असतात
- Test line-- T
- Control line-- C
- ह्या तपासणी मध्ये hCG चे प्रमाण 25 mIU/mL पेक्षा जास्त असल्यास Test line दिसते.
- Control line ही नेहमीच दिसते. जे हे दर्शवते की तुम्ही केलेली तपासणी व्यवस्थित पार पडलेली आहे.
लघवी चा नमुना कसा गोळा करायचा/how to collect urine sample
- स्वच्छ व कोरड्या कंटेनरमध्ये लघवी/ युरीन गोळा करावी.
- पहाटेची पहिली लघवी First morning urine तपासनीस घेतल्यास तपासणीचा परिणाम अधिक प्रभावी येतो.
- मध्य प्रवाहातील लघवी /mid tream urine सॅम्पल गोळा करावे.
- तपासणी लगेच न करता आल्यास, युरीन 2°–8°C पर्यंत 72 तास पर्यंत स्टोअर करून ठेवता येते.
- तपासणीपूर्वी लघवी चे सैंपल साधारण तापमानाला आणावे/room temperature.
मूत्र गर्भधारणा चाचणी UPTकरण्याची पद्धत /Procedure of UPT
- गर्भधारणेची चाचणी अचूक करण्याकरिता सकाळची पहिली मध्य प्रवाहातील लघवी mid stream urine स्वच्छ कंटेनर मध्ये जमा करावी.
- UPT किट पाउच मधून बाहेर काढा.
- UPT किट सपाट पृष्ठभागावर ठेवा.
- UPT किट मध्ये दर्शवलेल्या ठिकाणी लघवीचे काही थेंब ड्रॉपरने टाका.
- 3 ते 5 मिनिटे थांबा.
- 15 मिनिटे नंतर चा निकाल अवैध मानल्या जातो.
निकाल कसा वाचावा? /How to Interpret result?
How to read result1.पॉझिटिव्ह /Positive
2.निगेटिव्ह /Negative
3.अवैध /Invalid
4.अवैध /Invalid
युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट ची मर्यादा /Limitations of UPT
-
प्रोझोन इफेक्ट/ Prozone Effect
- hCG हार्मोन ची लेवल खूप जास्त (>500,000 mIU/mL) असल्यास निगेटिव्ह रिपोर्ट येऊ शकतो.
- अशावेळी लघवी चे सैंपल 1:1 प्रमाणात डाइलूट करून तपासणी करावी
-
डाइलूट सॅम्पल /Dilute Sample
- लघवी फारच डायलूट असल्यास hCG चे प्रमाणात फारच कमी आढळू येते.
- अशावेळी सकाळची लघवी घेऊन 48 तासांनी परत तपासणी करावी
-
अन्य रोगांमध्ये hCG वाढतो/hCG increased in other disease
- हायदाटीफॉर्म मोल,अंडकोष, स्तन, फुफ्फुसांचे कॅन्सर यामध्ये hCG वाढतो.
- त्यामुळे केवळ hCG हार्मोन ची तपासणी करून गर्भधारणा आहे की नाही हे ठरवणे कठीण असते.
-
मासिक पाळी अनियमित /Irregular menstrual cycle
- जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा काही कारणामुळे मासिक पाळीमध्ये अडथळे येत असतील तर लैंगिक संबंधानंतर ३ आठवड्यांनी गर्भधारणा तपासणी केल्यास परिणाम अचूक मिळतो.