सिल्व्हरलाईन क्लिनिक ब्लॉगवर आपलं स्वागत आहे – आजच नवीन लेख वाचा आणि आरोग्यविषयी माहिती मिळवा अधिक वाचा
पोस्ट्स

गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) हायपर ऍसिडिटी :लक्षणे, आहार आणि उपचार

GERD हायपर ऍसिडिटी म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, आहार व उपचा. छातीत जळजळ, आंबट ढेकरं यावर उपाय जाणून घ्या.



           GERD किंवा हायपर ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्ताचा त्रास

परिचय

गॅस्ट्रोईसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) ही पचनसंस्थेशी संबंधित एक सामान्य परंतु त्रासदायक समस्या आहे. यामध्ये पोटातील ऍसिड अन्ननलिके परत वर येते आणि छातीत जळजळ, उचकी, अन्न गिळताना त्रास, आणि कधीकधी खोकला येणे अशी लक्षणे दिसून येतात. योग्य जीवनशैली आणि आहार ह्याचे व्यवस्थापन करून GERD वर प्रभावीपणे मात करता येऊ शकते.

GERD हायपर ऍसिडिटी म्हणजे काय? 

GERD म्हणजे पोटातील गॅस्ट्रिक अ‍ॅसिड अन्ननलिकेत येणे. सामान्यतः अन्न गिळल्यानंतर अन्ननलिका व पोटाच्या मध्ये असलेला "लोअर इसोफेजियल स्पिंटर" (LES) बंद होतो. पण GERD मध्ये LES नीट बंद होत नाही आणि पचनासाठी आवश्यक असलेले अ‍ॅसिड अन्ननलिकेत परत येते.

          GERD मध्ये पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत जातं






GERD ची  कारणे 

  1. अन्ननलिकेतील झडप कमजोर होणे
    अन्ननलिकेच्या तळाशी असलेली झडप (Lower Esophageal Sphincter – LES)  नीट बंद न झाल्यास पोटातील गॅस्ट्रिक ऍसिड अन्ननलिकेत येते.
  2. चुकीच्या आहारपद्धती
    तळलेले, तेलकट, मसालेदार पदार्थ
    आंबट अन्न (टोमॅटो, लिंबू, चिंच)
    अती थंड पेये, कोल्ड ड्रिंक्स, कॅफीनयुक्त पेये
  3. जीवनशैलीतील बदल
    अति धूम्रपान, मद्यपान
    अन्न सेवन केल्यानंतर लगेच झोपणे
    लठ्ठपणा
  4. औषधांचे दुष्परिणाम
    NSAIDs, अँटीबायोटिक्स, पेन किलर 
  5. गर्भधारणा
    हार्मोनल बदलामुळे LES वर दाब येतो
  6. हर्निया, आहारातील चरबीयुक्त पदार्थ, मानसिक तणाव

GERD ची लक्षणे

  1. छातीत  मध्यभागी जळजळ (Heartburn)
  2. आंबट ढेकरं आणि तोंडात आम्ल येणे
  3. गिळताना त्रास होणे
  4. घसा खवखवणे, सतत खोकला येणे
  5. आवाज बसणे, श्वास घेण्यास त्रास होणे
  6. दीर्घकालीन लक्षणे असतील तर:
    • अन्ननलिकेची जखम (Esophagitis)
    • इसोफेगस स्ट्रिक्चर
    • बारेट इसोफेगस (कर्करोगाचा धोका)
  7. उचल्या लागणे
  8. घशात जळजळ होणे
  9. श्वासाची दुर्गंधी येणे
  10. सदैव पोट भरल्यासारखे वाटणे
  11. जेवण केल्यानंतर अस्वस्थता वाटणे
  12. जेवणानंतर छातीत दुखणे

निदान (Diagnosis)

डॉक्टर GERD चे निदान मुख्यतः लक्षणांच्या आधारे करतात . परंतु काही गंभीर स्थितीत खालील तपासण्या करण्यास सांगतात.

  • UGI Endoscopy (गॅस्ट्रोस्कोपी)
  • 24-hr pH Monitoring
  • Esophageal Manometry
  • Barium Swallow X-ray

छातीतील जळजळ थांबवण्यासाठी उपाय

  • जळजळ होणारे अन्न पदार्थ टाळवे 
  • वजन कमी करणे
  • झोपताना शरीराचा वरचा भर वर राहील अशा पद्धतीने झोपावे
  • कमी जेवण करणे
  • मन शांत ठेवायचा प्रयत्न करावा
  • धूम्रपान, दारू वर्ज्य करा
  • चहा ,कॉफी घेणे टाळा

जीईआरडीचे उपचार

  • जीवनशैलीत बदल करा:
    • वजन कमी करा
    • आहारातील बदल
    • एकाच वेळेला जास्त जेवण टाळा
    • खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळा
    • पलंगाचे डोके 6-8 इंचांनी उंच करा
  • औषधे:
    • अँटासिडस्
    • H2 ब्लॉकर्स
    • प्रोटॉन पंप इनहिबिटर (पीपीआय)
    • प्रोकिनेटिक्स
  • शस्त्रक्रिया:
    • फंडोप्लिकेशन
    • लिनक्स डिव्हाइस
    • एंडोस्कोपिक प्रक्रिया

GERD रुग्णांसाठी आहार मार्गदर्शन 

सेवन करायचे पदार्थ (allowed food)

प्रकारउदाहरण
कणसेगव्हाची पोळी, मलमलित भात, दलिया, ओट्स
फळेकेळं, सफरचंद, पपई, चिकू, कलिंगड
भाज्यादोडका, गाजर, बीटरूट, बटाटा (मर्यादित), तुर
प्रथिनंपातळ मूग डाळ, हरभरा डाळ, उकडलेले अंडी (पांढरं भाग), कमी फॅट असलेले दूध
फॅट्स तेल (गोडतेल/जैतून तेल), तूप (मर्यादित)
इतरलसूण, सौंफ, ओवा, धने-जिरे काढा (पचन सुधारक)

टाळावयाचे पदार्थ (Avoid Foods)

  • मसालेदार, तिखट पदार्थ
  • तळलेले पदार्थ
  • सॉस, केचप, व्हिनेगर
  • चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स
  • चॉकलेट, बेकरी उत्पादने
  • पुदिना, पेपरमिंट
  • मद्यपान व धूम्रपान
  • झोपण्याच्या आधी जेवण

GERD रुग्णासाठी दिवसाची आहार योजना

सकाळ (सकाळी 7:00 - 8:00):
1 ग्लास कोमट पाणी + सौंफ किंवा जीऱ्याचा काढा
नाश्ता: ओट्स किंवा दलिया + 1 केळं
पर्याय: गव्हाची पोळी + थोडी भाजी + लो-फॅट दही

मधल्या वेळेस (10:30 - 11:00):
1 सफरचंद किंवा पपईचे तुकडे
कोमट पाणी किंवा लिंबूपाणी (साखर न टाकता)

दुपारचे जेवण (1:00 - 2:00):
गव्हाची पोळी (2) किंवा भात (थोडा)
पातळ आमटी (मूग/तूर डाळ)
शिजवलेली भाजी (गाजर, दोडका, भोपळा)
लो-फॅट ताक

संध्याकाळी (4:30 - 5:30):
1 कप लो-फॅट दूध (गरम करुन)
साखर न टाकता किंवा बिस्कीट्सविना
किंवा बटाट्याचे थोडे उकडलेले तुकडे

रात्रीचे जेवण (7:30 - 8:00):
2 पोळ्या + पचायला हलकी भाजी
थोडा भात + पातळ आमटी
ताक (ताजी आणि पातळ)

झोपण्यापूर्वी: कोमट पाणी

महत्वाच्या सूचना:

  • जेवणानंतर 2-3 तास झोपायला जाऊ नये
  • ताजा आहार घेणे, कमी तिखट व हलकं जेवण असावे
  • दररोज थोडं चालणं किंवा पचन सुधारण्यासाठी हालचाल करावी
  • खूप उशीराने जेवण किंवा भरपेट खाणं टाळावं
  • लठ्ठपणा असल्यास वजन कमी करावे

जर रुग्णाला व्हिटॅमिन B12, आयर्न, कॅल्शियम, आणि व्हिटॅमिन D ची कमतरता असल्यास:

  • लो-फॅट दूध, ताक, दही
  • उकडलेले अंडे (पांढरं भाग)
  • गडद हिरव्या पालेभाज्या (उकडून)
  • बदाम, अक्रोड (थोड्या प्रमाणात)
  • सूर्यप्रकाशात दररोज 15 मिनिटे बसणे सकाळी 11 ते दुपारी 3 ह्या दरम्यान (व्हिटॅमिन D साठी)
  • डॉक्टरांनी सांगितलेले सप्लिमेंट नियमित घ्यावेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. GERD म्हणजे काय?

GERD म्हणजे गॅस्ट्रोईसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, हा एक पचनसंस्थेशी संबंधित आजार आहे ज्यामध्ये पोटातील ऍसिड किंवा अन्न परत अन्ननलिकेत (इसोफॅगस) जाते, त्यामुळे छातीत जळजळ, उचकी लागणे, अन्न गिळताना त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात.

2. GERD ची लक्षणे कोणती असतात?

GERD मध्ये साधारणता छातीत जळजळ होणे, अन्न परत वर येणे, गिळताना त्रास होणे, छातीत वेदना जाणवणे, वारंवार खोकला येणे, आवाज बसणे, गळ्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसतात.

3. GERD का होतो?

GERD होण्याची कारणे म्हणजे अन्ननलिकेच्या खालील स्फिंक्टर कमजोर होणे, लठ्ठपणा, हायाटल हर्निया, धूम्रपान, गर्भधारणा, काही अन्नपदार्थ किंवा औषधी आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे यामुळे होतो.

4. GERD वाढवणारे अन्नपदार्थ कोणते आहेत?

GERD वाढवणारे अन्नपदार्थ म्हणजे तिखट व मसालेदार पदार्थ, संत्री व लिंबू यासारखी आम्ल फळे, टोमॅटो, चॉकलेट, तेलकट व तळलेले पदार्थ, कॉफी व चहा, मद्यपान, कोल्ड ड्रिंक्स आणि पेपरमिंट हे आहेत.

5. GERD चे निदान कसे केले जाते?

GERD चे निदान मुख्यतः रुग्णाच्या लक्षणांवरूनच केले जाते, पण काही वेळा एंडोस्कोपी, २४ तासांची pH मॉनिटरिंग, इसोफॅगियल मॅनोमेट्री किंवा बेरियम स्वॅलो टेस्ट चा वापर करावा लागतो.

6. GERD बरा होतो का?

GERD ही दीर्घकालीन आजार असून तो पूर्णपणे बरा होत नाही, परंतु योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि औषधोपचारांद्वारे लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात, काही वेळा शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते.

7. GERD चा उपचार कसा करतात?

GERD चा उपचार जीवनशैलीत बदल करून व औषधोपचारांद्वारे केला जातो, जसे की अँटासिड्स, H2 ब्लॉकर्स, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स वापरणे आणि गरज भासल्यास शस्त्रक्रिया करणे.

8. GERD मुळे काय गुंतागुंत होऊ शकते?

GERD दीर्घकाळ टिकल्यास अन्ननलिकेला  इजा होऊन इसोफॅजायटीस, अन्ननलिकेचा आकुंचन, बॅरेट्स इसोफॅगस आणि दुर्मीळ अशा इसोफेजियल कर्करोगाची शक्यता निर्माण होऊ शकते.

9. लहान मुलांमध्ये GERD होऊ शकतो का?

होय, GERD हा अर्भक आणि लहान मुलांमध्येही होऊ शकतो, ज्यामध्ये वारंवार उलटी होणे, खाण्यास नकार देणे, रडणे आणि वजन वाढ न होणे ही लक्षणे दिसतात.

10. GERD साठी कोणते जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत?

GERD साठी गरजेचे बदल म्हणजे कमी प्रमाणात पण वारंवार अन्न घेणे, जेवल्यावर लगेच झोपू नये, झोपताना उशी उंच ठेवणे, वजन कमी करणे, धूम्रपान बंद करणे, त्रासदायक अन्न टाळणे आणि सैल कपडे वापरणे हे आहेत.

11. GERD वर तणावाचा परिणाम होतो का?

होय, मानसिक तणाव GERD ला थेट कारणीभूत नसला तरी लक्षणे अधिक तीव्र करण्यास कारणीभूत ठरतो.

12. GERD चा उपचार किती काळ चालतो?

GERD चा उपचार रुग्णाच्या लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो, सौम्य लक्षणे काही आठवड्यांत बरी होतात तर काही रुग्णांना दीर्घकालीन उपचारांची गरज भासते.


नमस्कार बंधू आणि भगिनींनो. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझी शैक्षणिक पात्रता :एमबीबीएस, एमडी (बालरोग विशेषज्ञ) आणि जनरल फिजिशियन मी रुग्णांच्या संपूर्ण आरोग्यासाठी समर्पित आहे. बालकांपासून ते प्रौढा…

टिप्पणी पोस्ट करा

तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे! कृपया शंका, अभिप्राय किंवा अनुभव खाली शेअर करा.