सिल्व्हरलाईन क्लिनिक ब्लॉगवर आपलं स्वागत आहे – आजच नवीन लेख वाचा आणि आरोग्यविषयी माहिती मिळवा अधिक वाचा

निरोगी गर्भधारणेसाठी टाळावयाचे अन्नपदार्थ /Pregnancy Diet: Foods to Avoid for a Healthy Pregnancy

गर्भधारणेदरम्यान कोणती अन्नपदार्थ टाळावीत? अर्धवट शिजलेले मास, पाऱ्याचे प्रमाण जास्त असलेली मासे, कच्चे अंडी, ह्या सारख्या अन्नपदार्थांपासून दूर राहा

गर्भधारणेत टाळायचे अन्नपदार्थ Food to Avoid During Pregnancy.

गरोदरपणात महिलांनी कोणते अन्नपदार्थ टाळावेत? पपई, अननस, कच्चे मांस इ. यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो.  ह्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.



सारांश Introduction

गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील वेळ असते. या काळात आहाराची योग्य काळजी घेतल्यास आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहते. काही अन्नपदार्थ असे असतात जे गर्भाच्या विकासासाठी घातक ठरू शकतात. या लेखात आपण गरोदरपणात टाळावयाचे अन्नपदार्थ आणि त्यामागची कारणे काय आहेत ते पाहणार आहोत.

1. पपई Papaya

कच्च्या पपईमध्ये  'पेपेन' एन्झाईम असते, हे एन्झाइम गर्भाशय आकुंचनास कारणीभूत ठरते, त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. विशेषतः गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसात कच्ची पपई  खाणं टाळाव 

2. अननस Pineapple

अनन मध्ये असलेला 'ब्रोमेलाइन' एन्झाईम गर्भशयाचे मुख(cervix) नरम करू शकतो, ज्यामुळे अकाल प्रसूतीचा किंवा गर्भपाताचा धोका निर्माण होतो.

3. कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस  uncooked meat 

अशा प्रकारच्या मांसामध्ये टॉक्सोप्लाझ्मा, साल्मोनेला, किंवा लिस्टेरिया सारखे जंतू असू शकतात, जे गरोदर मातांसाठी अत्यंत हानिकारक आहेत.

4. पाऱ्याचे /मर्क्युरी प्रमाण जास्त असलेली मासोळी Fish high in mercury

शार्क, स्वॉर्डफिश, टूना,मर्लिन यासारख्या मासळी मध्ये मर्क्युरी (पारा) चे प्रमाण अधिक असते. हे बाळाच्या मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम करते.

5. कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली अंडी Raw or undercooked eggs

अशा अंड्यांमध्ये साल्मोनेला जंतू असण्याची शक्यता असते, ज्यामुळे  विषबाधा होऊ शकते.

साल्मोनेला इन्फेक्शन ची लक्षणे

  • ताप
  • मळमळ वाटणे
  •  उलट्या
  • जुलाब
  • पोट दुखणे


6. न धुतलेली फळे व भाज्या Unwashed fruits &vegetables

यामध्ये टॉक्सोप्लाझ्मा, ई. कोली, आणि लिस्टेरिया सारखे जंतू असू शकतात, जे आरोग्यास गंभीर धोके निर्माण करू शकतात.

7. अल्कोहोल Alcohol 

गर्भधारणेदरम्यान अल्कोहोलचे सेवन केल्यास फीटल अल्कोहोल सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो, ज्याचा बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होतो.

8. कॅफीन Caffine

दररोज 200 मिलिग्रॅम पेक्षा कमी कॅफिन घेणे सुरक्षित मानले जाते.
याचे मोजमाप खालील प्रमाणे दिलेले आहे 
  • 1 कप कॉफी
  • 2 कप चहा
  • 1-2 बॉटल कोल्ड ड्रिंक
  • 1 बार डार्क चॉकलेट मधे 30-50 mg कॅफिन असते.

जास्त प्रमाणात कॅफीन चे सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढवू शकतो तसेच बाळाचे वजन कमी होण्यास कारणीभूत ठरते उदा. रेड बुल, ब्लॅक कॉफी, स्टिंग.

9. प्रोसेस्ड व जंक फूड Processed food &junk food

यामध्ये  साखर, मीठ व चरबीचे प्रमाण जास्त असल्या कारणाने मधुमेह, वजनवाढ, आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या होऊ शकतात.जेवणात प्रथिने,लोह,फायबर युक्त कार्बोहाइड्रेट ,फळे,भाजी cha समावेश करावा.

10. कच्चे अंकुर Sprouts

साल्मोनेलाई. कोली सारख्या जंतूंचा धोका असतो, ज्यामुळे  अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आणखी वाढते. बियाणे अंकुरित होण्यासाठी दमट वातावरण लागते हे दमट वातावरणात साल्मोनेला बॅक्टरिया च्या वाढीस मदत करते.

11.कच्चे अंडे Raw egg

कच्च्या अंड्या मध्ये साल्मोनेला नावाचे बॅक्टररिया असतात.

12.फळांचा रस Fruit juice

तुम्ही pasteurised आणि साखर न टाकलेला ज्यूस घेऊ शकता. स्टॉल वर काढलेल्या कच्च्या ज्यूस मध्ये बॅक्टरिया असू शकतो ते पिणे टाळावे.


गर्भधारणेदरम्यान योग्य आणि संतुलित आहार घेणे हे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पालेभाज्या व फळे योग्य  प्रकारे धुवून व चांगले शिजवून खाणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही आहारविषयक शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

internal linking suggestions

Pregnancy check kit

pregnancy planning tips




नमस्कार बंधू आणि भगिनींनो. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझी शैक्षणिक पात्रता :एमबीबीएस, एमडी (बालरोग विशेषज्ञ) आणि जनरल फिजिशियन मी रुग्णांच्या संपूर्ण आरोग्यासाठी समर्पित आहे. बालकांपासून ते प्रौढा…

टिप्पणी पोस्ट करा

तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे! कृपया शंका, अभिप्राय किंवा अनुभव खाली शेअर करा.