Learn about the new variant of Covid-19: JN.1 in 2025
अनुक्रमणिका
- प्रस्तावना
- JN.1 व्हेरिएंटची सामान्य लक्षणे
- JN.1 व्हेरिएंटचे निदान
- प्रसार आणि गंभीरतेचा धोका
- JN.1 व्हेरिएंटचा उपचार
- प्रतिबंध व सावधगिरी
- लसीकरण व प्रतिकारशक्ती
- निष्कर्ष
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रस्तावना
JN.1 नवा व्हेरिएंट म्हणजे काय?
JN.1 हा कोविड-19 च्या ओमिक्रॉन च्या उपप्रकारांपैकी एक नवीन उपप्रकार आहे, जो सर्वप्रथम 2023 मध्ये लक्झेंबर्ग मध्ये ओळखला गेला होता हा व्हेरिएंट आता भारतासह अनेक देशांमध्ये पसरत चालला आहे. WHO आणि ICMR च्या माहितीनुसार, त्याच्या स्पाइक प्रोटीनमधील विशिष्ट उत्परिवर्तनांमुळे, JN.1 अधिक संसर्गजन्य असल्याचे आहे, परंतु सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तो गंभीर आजार निर्माण करत नाही असे लक्षात आलेय.WHO (World Health Organization):
WHO ने डिसेंबर 2023 मध्ये JN.1व्हायरस ला "Variant of Interest (VOI)" म्हणून घोषित केलेले आहे. ह्या इन्फेक्शन ची लक्षणे सौम्य स्वरूपाची आढळतात, परंतु वृद्ध, गरोदर महिला व रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांमध्ये अधिक धोका संभवतो.ICMR (Indian Council of Medical Research):
भारतातील पहिला JN.1 रुग्ण केरळमध्ये सापडला. ICMR च्या मते, RT-PCR पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये JN.1व्हायरस चा प्रादुर्हभाव हळूहळू वाढत आहे. लसीकरण करूनही परत इन्फेक्शन होण्याचा धोका आहे, परंतु लक्षणे ही सौम्य राहतात.सारणी
- लक्षणे
- निदान, चाचणी
- उपचार
- प्रतिबंध
- लसीकरण आणि रोगप्रतिकार शक्ती
- निष्कर्ष
- विचारले जाणारे प्रश्न
कोव्हिड JN.1 व्हेरिएंटची सामान्य लक्षणे
श्वसन प्रणालीशी संबंधित लक्षणे:
- सतत खोकला (कोरडा किंवा थोडा कफसह)
- घशात खवखव किंवा वेदना
- नाक वाहणे किंवा बंद होणे
- श्वास घेण्यास त्रास (गंभीर प्रकरणांमध्ये)
सामान्य लक्षणे:
- सतत कमी तापमानाचा ताप असणे (99.6°F ते 100.5°F)
- थकवा व अशक्तपणा
- डोकेदुखी
- स्नायू किंवा शरीरात वेदना जाणवणे
पाचन संस्थेशी संबंधित लक्षणे:
- मळमळ आणि भूक कमी होणे
- पोटात अस्वस्थता जाणवणे
- पातळ संडास लागणे
इतर लक्षणे:
- विचारशक्ती कमकुवत होणे (brain fog)
- डोळे लालसर होणे, डोळ्यांची आग होणे, जळजळ होणे
ही लक्षणे सामान्यतः सौम्य दर्जाची असतात आणि बरेच रुग्ण घरीच आराम करून ठीक होतात. परंतु वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि इतर आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्या कारणाने ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागते.
JN.1 व्हेरिएंटचे निदान
RT-PCR चाचणी:
ह्या तपासणी मध्ये इन्फेक्शन च्या सुरुवातीलाच व्हायरस चा तपास लावता येतो. ही तपासणी सर्वात अचूक असून मोठ्या प्रमाणात वापरली जाते. नाक किंवा घसा चा स्वॅब नमुन्यांच्या रूपात घेतला जातो.रॅपिड अँटीजन चाचण्या (RATs):
ही तपासणी स्क्रिनिंग टेस्ट म्हणून वापरता येते. ह्या तपासणीचा निकाल अवघ्या 15-30 मिनिटांत उपलब्ध होतो. जर निकाल निगेटिव्ह आला तर कन्फर्मेशन साठी RT-PCR चाचणी करणे आवश्यक असते.JN.1 व्हेरिएंटचा प्रसार आणि गंभीरतेचा धोका
JN.1 हा कोव्हिड 19 चा व्हेरिएंट असून तो अधिक वेगाने पसरतो. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जन.1 हा व्हेरिएंट गंभीर आजार निर्माण करत नाही. बहुतेक रुग्ण सहसा 5 ते 7 दिवसांत बरे होऊन जातात. मात्र, वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि इतर आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.JN.1 व्हेरिएंटचा उपचार
सौम्य लक्षणे असल्यास:
- घरी विश्रांती करणे आणि भरपूर पाणी पिणे
- ताप आणि शारीरिक वेदना असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे
- स्टीम घेणे आणि गुळण्या करणे
गंभीर लक्षणांसाठी:
ऑक्सिजन लेवल 94% पेक्षा कमी झाल्यास किंवा लक्षणे आणखी बिघडल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणे.
प्रतिबंध आणि सावधगिरीच्या उपाययोजना
- लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करा आणि इतरांपासून स्वतःला दूर ठेवा.
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
- वारंवार हात धुवा आणि सॅनिटायझर चा वापर करा.
- लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा
- पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करून रोग प्रतिकारशक्ती वाढवा.
- पुरेशी झोप घेणे