सिल्व्हरलाईन क्लिनिक ब्लॉगवर आपलं स्वागत आहे – आजच नवीन लेख वाचा आणि आरोग्यविषयी माहिती मिळवा अधिक वाचा
المشاركات

इन्फ्लूएंझा (फ्लू) लक्षणे, जोखीम घटक ,प्रतिबंध ,उपचार व संरक्षण Influenza (flu): Symptoms, risk factors, prevention, treatment and protection

फ्लू म्हणजे इन्फ्लूएंझा हा श्वसनमार्गाने पसरणारा व्हायरल आजार आहे. ह्या लेखात आपण फ्लू आजारा बद्दल आणि लसीकरणाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.




              "फ्लूपासून संरक्षण हवे? लस घ्या, सुरक्षित राहा!"

अनुक्रमणिका

  • प्रस्तावना
  • फ्लू म्हणजे काय?
  • फ्लू कशामुळे होतो?
  • फ्लूची लक्षणे
  • फ्लूमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स
  • कोणत्या लोकांना जास्त धोका असतो?
  • फ्लू प्रतिबंध कसा करायचा?
  • फ्लूचे निदान
  • फ्लू चा उपचार
  • काय करावे आणि काय करू नये
  • निष्कर्ष
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रस्तावना

हिवाळ्या मध्ये होणारा फ्लू (Influenza) हा  संसर्गजन्य आजार आहे. फ्लू ह्या संसर्गामुळे फुफ्फुस वर विपरीत परिणाम होऊन गंभीर समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता वाढते. फ्लूमुळे दरवर्षी हजारो रुग्ण दगावतात आणि लाखो रुग्णांना दवाखान्यात भरती करावे लागते. यासाठी फ्लूविरोधी लस ही एक प्रभावी प्रतिबंधक उपाययोजना आहे.

फ्लू म्हणजे काय?

फ्लू किंवा इन्फ्लुएंझा हा व्हायरसमुळे पसरणारा आजार आहे. तो श्वसनमार्ग मार्फत  पसरतो आणि एक व्यक्ती दुसऱ्याला संक्रमित करू शकतो. फ्लू चा कालावधी सामन्यात एप्रिल ते सप्टेंबर पर्यंतचा असतो. फ्लू ची तीव्रता आणि कालावधी वेगवेगळा असू  शकतो.

फ्लू कशामुळे होतो?

फ्लू मुख्यतः इन्फ्लुएंझा A आणि B प्रकारच्या व्हायरस मुळे होतो. हे विषाणू हवेच्या माध्यमातून (ड्रॉपलेट) पसरतात. ह्या वायरस  मधे सतत बदल होत असल्यामुळे प्रत्येक वर्षात नवीन स्ट्रेन उद्भवतात.

फ्लूची लक्षणे

  • ताप अथवा थंडी वाजून ताप येणे
  • सर्दी,नाक बंद होणे,खोकला
  • घशात खवखव,घसा दुखणे
  • हात पाय दुखणे
  • थकवा आणि अशक्तपणा येणे
  • डोकेदुखी
  • काही मुलांमध्ये उलट्या व जुलाब
  • भूक न लागणे
  • मळमळ होणे

फ्लूमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स

  • न्यूमोनिया
  • ब्रॉन्कायटिस
  • सायनस इन्फेक्शन
  • कानाचे इन्फेक्शन
  • हृदय, फुप्फुस किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये आजार जास्त बळावतो.
  • दमाच्या झटका  येणे.

कोणत्या लोकांना जास्त धोका असतो?

  • 5 वर्षांखालील बालक
  • 65 वर्षांवरील वृद्ध
  • गरोदर स्त्रिया दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये फ्लू चा धोका जास्त असतो.
  • मधुमेह, हृदयरोग, कर्करोगग्रस्त रुग्ण
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण
  • धूम्रपान ,मद्यपान करणारी व्यक्ती

फ्लू प्रतिबंध कसा करायचा?

फ्लू लस:

दरवर्षी फ्लू ची लस घेणे त्यामुळे दवाखान्यात भरती होण्याचे टळू शकते.

इतर प्रतिबंध पद्धती:

निरोगी सवयींचे अनुसरण करा जसे-

  • साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा
  • फर्निचर आणि खेळणी यांसारख्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशक वापरा.
  • खोकलाताना आणि शिंकताना तोंड झाकल्याने संसर्गाचा धोका कमी होतो.
  • न धुतलेल्या हातांनी नाक, तोंड आणि डोळ्यांना स्पर्श करायचे टाळा
  • रोज रात्री आठ तास झोपा.
  • नियमित व्यायाम आणि पौष्टिक भाजीपाला चा वापर करा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा.

फ्लूचे निदान (इन्फ्लूएंझा)

  • रुग्णाची हिस्ट्री आणि लक्षणे चा अंदाज घेऊन निदान करणे.
  • PCR टेस्ट जी इतर टेस्ट च्या तुलनेत अधिक संवेदनशील आहे.

फ्लू चा उपचार:

  • बरेचदा फ्लू हा स्वतःहून बरा होतो
  • अंगदुखी असल्यास वेदना शामक औषधी घेऊन आजार बरा होतो
  • अधिक आराम करणे आणि भरपूर द्रवयुक्त पदार्थ चे सेवन करणे
  • गंभीर आजारात फ्लू चे कॉम्प्लिकेशन वाढायची शक्यता असते तेव्हा डॉक्टर तुम्हाला अँटीव्हायरस औषधी घेण्याचा सल्ला अथवा दवाखान्यात भरती होण्याचा सल्ला देऊ शकतात.

काय करावे आणि काय करू नये:

काय करावे काय करू नये
पूर्ण लसीकरण करून घेणे अश्वच्छ हाताने स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श करणे.
वारंवार हात धुणे नाक तोंड न झाकता खोकलणे किंवा शिंकणे.
पौष्टिक आहार घ्या धूम्रपान आणि दारूचे सेवन करणे
डॉक्टर च्या सल्ल्यानुसार औषधी घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे
भरपूर आराम करा पाणी कमी पिणे


फ्लू लसीकरणाबद्दल माहिती

फ्लूची लस घेणे का आवश्यक आहे?

  • फ्लूची लसीकरणामुळे संसर्गाची तीव्रता कमी होते
  • लसीकरण केल्यास फ्लू मुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स कमी करता येतात
  • लसीकरणामुळे हजारो लोकांचे जीव वाचतात
  • दवाखान्यात भरती होण्याची शक्यता कमी करता येते

लसीकरणाचे वेळापत्रक

CDC नुसार, 6 महिन्यांवरील सर्वांनी प्रत्येक फ्लू हंगामात लस घ्यावी

  • दरवर्षी 1 डोस पुरेसा असतो
  • प्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित होण्यासाठी लसीनंतर 2 आठवडे लागतात

फ्लूचे लसीकरण कधी करायचे

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान. लस उशिरा घेतली तरी काही प्रमाणात संरक्षण देते.

लसीचे दुष्परिणाम

  • लस टोचलेल्या जागेवर सूज, लालसरपणा येणे
  • सौम्य ताप, अंगदुखी, डोकेदुखी होऊ शकते
  • अतिशय दुर्मिळ प्रमाणात – गिलेन-बार सिंड्रोम (GBS)
  • लसीकरणावेळी चक्कर येऊ शकते

गरोदरपणात फ्लू लसीकरण

  • गरोदरपनाच्या कुठल्याही टप्प्यावर फ्लू चे लसीकरण करता येते.
  • नवजात बाळालाही लसीद्वारे अप्रत्यक्ष रित्या संरक्षण मिळते
  • CDC आणि WHO ह्यांच्या नुसार गरोदर महिलेचे फ्लू सीझन मधे लसीकरण करून घ्यावे

लसीकरणापूर्वी काय काळजी घ्यावी

  • पूर्वी केलेल्या फ्लू लसीकरणामुळे गंभीर स्वरूपाची अ‍ॅलर्जी आली असेल तर सांगावे
  • गिलेन-बार सिंड्रोम (GBS) झाला असेल तर आजाराची माहिती द्यावी
  • सौम्य सर्दी ताप असल्यास लसीकरण करता येते, पण गंभीर आजार असल्यास लसीकरण टाळावे

गोंधळ आणि गैरसमज

  • लसीमुळे फ्लू होत नाही
  • लस घेतल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती सुधारते

लसीकरणानंतर काय करावे?

  • चक्कर आल्यास लगेच विश्रांती घ्यावी
  • कुठलाही दुष्परिणाम जाणवल्यास डॉक्टर चा सल्ला घ्यावा

आपातकालीन लक्षणे आणि मदतीसाठी काय करावे?

लस घेतल्यानंतर खालील प्रमाणे लक्षणे दिसल्यास लगेच 108 किंवा 112 वर कॉल करावा किंवा जवळच्या रुग्णालयात भेट द्यावी.

  • चेहऱ्यावर सूज येणे
  • श्वास घ्यायला त्रास झाल्यास
  • छातीत जडपणा वाटणे
  • शरीरावर पुरळ आल्यास

निष्कर्ष

फ्लू हा प्रत्येक हंगामात पुन्हा पुन्हा होणारा आजार आहे. यामुळे वैयक्तिक आणि समाजाची प्रतिकारशक्ती धोक्यात येते. या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी शस्त्र आहे. दरवर्षी लस घेणे, विशेषतः उच्च धोका असलेल्या गटात, अत्यंत गरजेचे आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

फ्लूची लस दरवर्षी घ्यावी लागते का?

हो. कारण फ्लू व्हायरस सतत बदलत असतो.

लसीनंतर आजारी पडल्यास काय करावे?

सामन्यात सौम्य लक्षणे असतात. मात्र गंभीर त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

माझ्या मुलाला याआधी फिट्स (seizure) झाले आहेत. लस घेऊ शकतो का?

हो. डॉक्टर चा सल्ला घेऊन लसीकरण करू शकता.

कोणती लस योग्य आहे – इंजेक्शन की नाकातील?

भारतात एनॅक्टिवेटेड वॅक्सीन इंजेक्शन द्वारे दिली जाणारी लस योग्य आहे.

फ्लूची 5 लक्षणे कोणती?

इन्फ्लूएंझाच्या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, गळा दुखणे. यांचा समावेश होतो. ही लक्षणे अचानक दिसून येतात आणि ती तीव्र असू शकतात. आराम करणे, भरपूर पाणी पिणे आणि आवश्यक असल्यास डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे.

फ्लू किती काळ टिकतो?

फ्लू साधारणता 1 ते 2 आठवडे टिकतो.

फ्लूसाठी सर्वोत्तम उपचार कोणता आहे?

विश्रांती, भरपूर पाणी पिणे, आवश्यक असल्यास डॉक्टर चा सल्ला घेणे.

फ्लू होण्यापासून कसे रोखता येऊ शकते?

वारंवार हात धुणे आणि आजारी व्यक्तींशी जवळीक टाळा. फ्लू लस ही सर्वोत्तम प्रतिबंध पद्धत आहे. निरोगी जीवनशैली.

फ्लूचा अँटिबायोटिक्स घेऊन उपचार केला जाऊ शकतो का?

नाही, इन्फ्लूएंझा उपचारांमध्ये अँटिबायोटिक्स चा समावेश नाही, कारण ते व्हायरल इन्फेक्शन्सवर कार्य करत नाही. काही परिस्थितीत अँटीव्हायरल औषधे लिहून दिली जाऊ शकतात.

फ्लू लस सुरक्षित आहे का?

होय, इन्फ्लूएंझा (फ्लू) लस सामान्यतः सुरक्षित असते आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी लस घेण्याचा सल्ला दिला जातो. साइड इफेक्ट्स सामान्यत: सौम्य आणि तात्पुरते स्वरूपाचे असतात, जसे की इंजेक्शन साइटवर दुखणे किंवा सौम्य ताप येणे.

मला फ्लू आहे की सर्दी आहे हे कसे कळेल?

फ्लू आणि सर्दी या दोन्हींमध्ये समान लक्षणे आढळतात, इन्फ्लूएंझाची लक्षणे अचानक उद्भवतात आणि जास्त ताप, अंगदुखी आणि लक्षणे जास्त गंभीर स्वरूपाची असतात. सर्दीमध्ये सामान्यत: शिंका येणे, नाक वाहणे असे सौम्य लक्षणे दिसतात.

नमस्कार बंधू आणि भगिनींनो. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझी शैक्षणिक पात्रता :एमबीबीएस, एमडी (बालरोग विशेषज्ञ) आणि जनरल फिजिशियन मी रुग्णांच्या संपूर्ण आरोग्यासाठी समर्पित आहे. बालकांपासून ते प्रौढा…

إرسال تعليق

तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे! कृपया शंका, अभिप्राय किंवा अनुभव खाली शेअर करा.